सन्मित्र सैनिकी विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर कंपनी डे साजरा
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 26 फेब्रुवारी 2025 ला सन्मित्र सैनिकी विद्यालयात सावरकरांच्या नावे आधारित सावरकर कंपनीचा दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आ. हंसराज अहिर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .सर्वप्रथम प्रमुख पाहुणे मा.श्री.हंसराज भैय्या अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.परेड निरीक्षणानंतर अतिथींनी विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारली. औपचारिक कार्यक्रमाला दीपप्रज्ज्वलनाने सुरुवात झाली. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या कु. अरुंधती कावडकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून देताना व आपले प्रास्ताविक सादर करताना कंपनी डे साजरा करण्या मागचा उद्देश विशद केला. आपल्या प्रास्ताविकात बोलताना प्राचार्य म्हणाल्या की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, छत्रपती शिवरायांनी पंधराव्या वर्चषी तोरणा जिंकला,त्याप्रमाणे वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्याची शपथ घेतली आणि आयुष्यभर ती ते जगले.किशोरांनी त्यातून प्रेरणा घ्यायला हवी.
नंतर वर्ग आठ चा विद्यार्थी देवल पानघाटे याने स्वातंत्र्यवीरां बद्दल आपले मत व्यक्त करतांना सांगितले की परतंत्र रूपी काळोखाला चिरण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकाशाचे किरण होते .शाळेत कंपनी निहाय किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ज्यात सुभाष कंपनीने पहिला क्रमांक पटकाविला. कंपनीचा सार्जन्ट अनुराग रामटेके याला प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या वीर सावरकर कंपनीचा कंपनी सार्जन्ट हर्ष मोहुर्ले यालाही तयाप्रसंगी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यानंतर कार्यक्रमात शाळेचे संगणक निदेशक श्री मंगेश देऊरकर यांनी "ने मजसी ने परत मातृभूमीला" हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री हंसराज अहीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की शिस्त, देशभक्तीचा मार्गतुम्ही निवडला आहे ,तुमच्या आई-वडिलांचं देशावर निश्चितच खूप प्रेम आहे म्हणूनच त्यांनी तुम्हाला या सैनिकी शाळेत प्रवेश दिला आहे. त्यांनी पुढे बोलतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फर्ग्युसन कॉलेज येथे भेट दिल्याचे नमूद केले. एकांत वास, नजर कैदेत, तुरुंगवासात यातच सावरकरांचे अर्धे आयुष्य गेले. त्यांनी युवकांना सेनेत सामील व्हायचे आवाहन केले होते, शस्त्रविद्या शिकून घ्यायला. आपला देश चारही बाजूंनी शत्रूंनी वेढलेला आहे. चीन, पाकिस्तान आपण निर्माण केलेला बांग्लादेश सर्वांपासून भारताला सुरक्षित राखण्याचे आवाहन सैनिकां- समोर आहे. म्हणूनच सैनिकी शाळा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कवी, कादंबरीकार होते, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक श्री. विनोद एडलावार यांनी केले. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मित्र मंडळाचे सचिव ॲड. श्री. निलेश चौरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नितीन कावरे, शाळेचे समादेशक श्री.सुरेंद्र कुमार राणा, शाळेच्या प्राचार्या कु.अरुंधती कावडकर व शाळेचे शिक्षक श्री. मोहन पाठक व सौ. गौरी तेलंग उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या"जयोऽ स्तुते श्री महन्मंगले "या सांघिक गीताने करण्यात आली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List