स्वप्न साकार करण्यासाठी व्हिजन असावे : मनपा उपाआयुक्त रवींद्र जोगदंड 

मॉडर्न कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

स्वप्न साकार करण्यासाठी व्हिजन असावे : मनपा उपाआयुक्त रवींद्र जोगदंड 

आधुनिक केसरी न्यूज 

राजरत्न भोजने 

छत्रपती संभाजीनगर : फॅशन डिझाईन कोर्स कधी न संपणार आहे. बीसीए कोर्स करणाऱ्यांना खूप स्कोप आहे. १०० लोकांचे काम बीसीए टेक्नॉलॉजी करणारे दोन विद्यार्थी करतात, म्हणून बीसीए विद्यार्थ्यांनी एआय चा कोर्स करावा,जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. बीएमडब्ल्यू कंपनी घेण्यासाठी रतन टाटा यांना आठ वर्षे लागले. मात्र त्यांनी बीएमडब्ल्यू गाडी न घेता बीएमडब्ल्यू कंपनी घेण्याचा विचार केला, असे तुमचेही व्हिजन असायला पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी वेळ लागला तरी चालेल पण स्वप्न मोठे असावी. स्पर्धेत जगायचे असेल तर अलर्ट राहिला पाहिजे. स्वतःमध्ये बदलाव घेऊन पुढे जावे स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस एक करा नक्कीच यश मिळेल,असे प्रतिपादन स्मार्ट सिटी मनपा उपाआयुक्त रवींद्र जोगदंड यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमात केले.

मॉडर्न कॉलेज आणि विक्रमशीला फॅशन डिझाईन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेह संमेलनाचे दिपप्रज्वलन उदघाटक स्मार्ट सिटी मनपा उपाआयुक्त रवींद्र जोगदंड, संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, बगाटे सर, प्राचार्य डॉ.संजय कांबळे, प्राचार्या साळवे मॅडम यांच्या उपस्थिती यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाले.

प्रदीप रोडे म्हणाले, तुमच्या जीवनात स्किल महत्वाची आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये जी क्षमता आहे. ते क्षमता स्मार्ट सिटी च्या विद्यार्थ्यांमध्ये नाही. म्हणून बीडच्या तुलसी कॉलेजमध्ये जर्मन भाषा कोर्स सुरू केला, नक्कीच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. विविध भाषा शिकल्याने विद्यार्थ्यांना जॉबच्या संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांच्या पाठीमागे संस्थाचाकल म्हणून कायम उभा राहील.विद्यार्थ्यांना  सोयी सुविधा पुरवतो ते अधिकाऱ्यामुळे शक्य आहे. अधिकारी वर्ग आम्हाला सपोर्ट करतात. अभ्यास केला विद्यार्थी ध्येय गाठू शकतात. संस्थाचाल प्रा.प्रदीप रोडे 

स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थांना मार्गदर्शन करत होते.स्नेहसंमेलनात विद्यार्थांनी पथनाट्य, लावणी शास्त्रीय नृत्य, समूह गायन, भीमगीत असे विविध कलाप्रकार सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. संतोष प्रधान, प्रा.ज्योती प्रधान,कॉलेज स्टाप आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देत रस्ते, विज, आरोग्य , शिक्षण, पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव तरतूद करुन राज्याला तिव्र गतीने विकसित करणारा अर्थसंकल्प राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देत रस्ते, विज, आरोग्य , शिक्षण, पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव तरतूद करुन राज्याला तिव्र गतीने विकसित करणारा अर्थसंकल्प
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : आज दि.१० मार्च २०२५ रोजी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय...
सर्वसमावेशक आणि विकासोन्मुख अर्थसंकल्प 
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित दादांनी केला 'हा' वादा....2047 पर्यंत...
महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
राज्यात खाणपट्टे लिलाव प्रक्रियेला गती द्यावी
“राष्ट्रपती महोदया, आम्हाला खुन करण्याची परवानगी द्या…”
क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव होणार संमत