शेततळ्यात अफूची शेती; तीन अधिकारी, 12 पोलिसांची शोध मोहीम यशस्वी

शेततळ्यात अफूची शेती; तीन अधिकारी, 12 पोलिसांची शोध मोहीम यशस्वी

 

आधुनिक केसरी

सुर्यकांत जगताप 

 * 13 वर्षांनंतर धारूरमध्ये पुन्हा अफूची शेती उघड
 * शेततळ्याच्या माध्यमातून पाणी साठवून अफूचे पीक
 * तीन गुंठे क्षेत्रावर लागवड; 40 ते 50 गोण्या अफू जप्त होण्याचा अंदाज

किल्ले धारूर : बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथे रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने बालाघाट पर्वतरांगेतील दुर्गम भागात तीन गुंठे जमिनीवर अफूची लागवड केली होती. या लागवडीसाठी त्याने शेततळ्याचा वापर करून पाणीपुरवठा केला होता. अफूच्या शेतीबाबत बीड एलसीबीला माहिती मिळाल्यानंतर, तीन अधिकारी आणि 12 पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी शोध मोहीम राबवली.
दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालली. या दरम्यान, पोलिसांनी तीन गुंठे जमिनीवरील अफूची झाडे उपटून काढली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या अफूचे वजन आणि किंमत मोजल्यानंतरच या प्रकरणातील अधिक तपशील समोर येईल. प्राथमिक अंदाजानुसार, 40 ते 50 गोण्यांपेक्षा जास्त अफू जप्त करण्यात आली आहे.
या घटनेमुळे धारूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. 10 वर्षांपूर्वी परळी आणि धारूरमधील कानपूर येथेही अफूची लागवड उघडकीस आली होती. अफूचा वापर नशेसाठी केला जातो. दुर्गम भागात शेततळ्याच्या मदतीने अफूची लागवड केल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
आधुनिक केसरी न्यूज नवी दिल्ली : 13 मार्च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी...
डॉ.माधवी खोडे चवरे यांनी स्वीकारला कुलगुरू पदाचा प्रभार
राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देत रस्ते, विज, आरोग्य , शिक्षण, पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव तरतूद करुन राज्याला तिव्र गतीने विकसित करणारा अर्थसंकल्प
सर्वसमावेशक आणि विकासोन्मुख अर्थसंकल्प 
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित दादांनी केला 'हा' वादा....2047 पर्यंत...
महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
राज्यात खाणपट्टे लिलाव प्रक्रियेला गती द्यावी