केंद्रिय राज्यमंत्री ना.मुरलीधर मोहोळ यांची भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
केंद्रिय राज्यमंत्री ना.मुरलीधर मोहोळ यांची भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
आधुनिक केसरी न्यूज
अंबाजोगाई : भारत सरकारचे विमान वाहतूक तथा सहकार राज्यमंत्री ना.मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी घरातील दर्शनी भागात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची प्रतिमा दिसताच मोहोळ नतमस्तक झाले. मुंडे साहेबांच्या जुन्या अनेक प्रसंगांना त्यांनी उजाळा दिला.
केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील काही मतदारसंघाचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी आले होते. अंबाजोगाई येथे श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान घरात प्रवेश करताच दर्शनी भागात त्यांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची प्रतिमा दिसली, तेव्हा नतमस्तक होऊन त्यांनी दर्शन घेतले. औपचारिक गप्पा मारताना माझ्या राजकीय आयुष्यात स्व.मुंडे साहेबांचा आशिर्वाद मला मिळालेला असून, काही प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही, आज मी मंत्री झालो असलो तरी यामागे त्यांचाही आशिर्वाद असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. जेंव्हा जेंव्हा साहेब पुण्यामध्ये यायचे तेव्हा तेव्हा साहेब आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायचो. मोठ्या भावासारखे माझ्यावर त्यांनी प्रेम केलं असं देखील त्यांनी यावेळी सांगीतले. याप्रसंगी कुलकर्णी परिवाराच्या वतीने मंत्री महोदयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी लातूर जिल्हा भाजपाचे प्रभारी किरण पाटील, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, मंत्री महोदयांचे वर्गमित्र राजेश कराड, सुजितसिंह ठाकुर, मंगेश शेप, मुकूंद शेप आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
Comment List