अनुताई दहेगावकर यांची अनुसूचित जाती विभाग गडचिरोली जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती...

अनुताई दहेगावकर यांची अनुसूचित जाती विभाग गडचिरोली जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : २८ ऑगस्ट रोजी विधानसभा मतदार संघ अनुसूचित जाती राखीव आहे.अनुताई दहेगांवकर यांची काँग्रेस पक्षाकडून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची दावेदारी भक्कम मानली जात आहे.अनुताई दहेगावकर या अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य सचिव आहेत. श्री सिद्धार्थ हत्तीअभोंरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या मान्यतेनुसार ऍड.राहुल साळवे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष यांनी अनुताई दहेगावकर यांची गडचिरोली जिल्ह्या अनुसूचित जाती विभाग जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

अनुताई दहेगावकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर चे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर यांच्या सुविद्य पत्नी असून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.त्या चंद्रपूर येथील स्थाई रहिवासी आहेत. मागील २० वर्षापासून अनुताई दहेगावकर काँग्रेस पक्षात सक्रिय काम करीत आहेत.त्यांचे चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील बुथनिहाय विविध संघटनाच्या आणि राजकीय केलेल्या कामाच्या माध्यमातून कार्यक्रर्त्यांचे जाळे आहे.चंद्रपूरच नव्हें तर जिल्हात सुद्धा त्यांचे एक मोठे नेटवर्क आहे.सामाजिक प्रतिमा उत्तम आहे.चंद्रपूर शहर महिला अध्यक्ष,जिल्हा महिला काँग्रेस कमिटी सचिव,जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष अश्या विविध पदाला त्यांनी न्याय दिला.सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग राज्यसचिव या पदावर कार्यरत आहेत.

अनुताई दहेगावकर यांना सामाजिक कार्याची ओढ आहे.गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यक्रमात त्या नेहमी सहभागी असतात.त्यांच्या नेतृत्वाखाली ५० वा धम्मचक्र अनुवर्तन दिन मोठ्या आंबेडकरी जनतेच्या उपस्थित संपन्न झाला. २०२२ मध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. २० ऑक्टो.२०२३ ला दिक्षाभुमी चंद्रपूर येथे धम्मचक्र दिनानिमित्त प्रसिद्ध बुध्दभिम गायीका कडुबाई खरात यांचा गिताच्या कार्यक्रमाला हजारो जनतेनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

अनुताई दहेगावकर यांनी पक्षांतर्गत आंदोलनात आणि सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला व आंदोलनाचे नेतृत्व सुद्धा केले.महिलांच्या आर्थिक विकासासाठी प्रबोधिनी नागरी सहकारी पत संस्था स्थापन करून अनेक गरजू महिलांना आर्थिक मदत करून रोजगार उपलब्ध करून देऊन सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला.

बेरोजगारी,वाढती महागाई,शेतकऱ्यांचे प्रश्न,महिलांचे प्रश्न,आदी प्रश्नांवर अनुताई दहेगावकर सातत्याने आंदोलने करीत असतात आणि आपला जनसंपर्क वाढवीत असतात.जनतेविरोधाच्या सरकारच्या भूमिकेवर लढणारा आक्रमक चेहरा म्हणजे अनुताई दहेगावकर. कधीही प्रसिद्धीच्या मागे न लागता प्रीपेड स्मार्ट वीज मीटर विरोधात मोठा जनआक्रोश सरकारच्या विरोधात निर्माण करण्याचे कार्य अनुताई दहेगावकर यांनी केल्यामुळे सरकारला प्रीपेड स्मार्ट वीज मीटर ला स्थगिती द्यावी लागली.

पक्षाने अनुताई दहेगावकर यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर अनुसूचित जाती विभाग गडचिरोली जिल्हा प्रभारी  पदाची जबाबदारी दिली आहे. अनुसूचित जाती विभाग गडचिरोली जिल्हा प्रभारी म्हणून अनुताई दहेगावकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस