चंद्रपूर येथील तत्कालीन शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण अखेर निलंबित...

चंद्रपूर येथील तत्कालीन शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण अखेर निलंबित...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : श्रीमती कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर या पदावर दिनांक 28/2/2022 पासून कार्यरत होत्या. तेव्हापासून चंद्रपूर जिल्ह्यातील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती प्रकरण, सेवानिवृत्ती उपदान, वैद्यकीय देयके, वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रकरणे, निवड श्रेणीची प्रकरणे, मृत कर्मचाऱ्यांचे गट विमाचे लाभ,वैयक्तिक मान्यतेची प्रकरणे अशा अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवणे. कर्मचाऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय प्रकरण निकाली न काढणे, असे भ्रष्टाचार करणे, यामुळे जिल्ह्यातील कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी,संस्था चालक यांना सतत आर्थिक व मानसिक समस्येला तोंड द्यावे लागत होते.

त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला संघटनेला सतत प्राप्त होत होत्या. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा सर्व पदाधिकारी, नागपूर विभागीय पदाधिकारी आणि *श्री रामदास गिरटकर* *माजी जिल्हा कार्यवाह चंद्रपूर आणि माननीय *श्री नागो गाणार,* *शिक्षक आमदार नागपूर विभाग नागपूर* यांनी मागील तब्बल दोन वर्षापासून सतत कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन श्रीमती कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारत अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तक्रारीची सत्यता शोधून,वेळोवेळी पुरावे गोळा करून, शासन- प्रशासनाकडे सतत पुराव्यानिशी पाठपुरावा केले.

त्यासाठी वरिष्ठ संबंधित कार्यालयाकडे शासन, प्रशासनाकडे तक्रार व निवेदने देऊन,धरणे, आंदोलने, मोर्चा काढून, वर्तमानपत्रात भ्रष्टाचारा विरूद्ध जनजागृती करून  मा.श्री नागो गाणार, आमदार पदावर कार्यरत असताना, श्रीमती कल्पना चव्हाण यांची विभागीय चौकशी करून निलंबित करावे. अशा प्रकारचे वारंवार शासनाकडे निवेदने दिले. 

मा.गाणार सरांच्या निवेदनाची व तक्रारीची शासनाने व प्रशासनाने दखल घेऊन, माननीय शिक्षण आयुक्त यांनी जानेवारी 2024 मध्ये श्रीमती कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करून विभागीय चौकशीचे आदेश निर्गमित केले.त्या अनुषंगाने विभागीय चौकशी केली. त्यात 1)श्री रामदास गिरटकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचे सेवानिवृत्ती वेतन मंजूर न करणे.2) दप्तर दिरंगाई करणे 3) लोकसेवा हमी कायदे अंतर्गत चुकीचा अहवाल सादर करणे 4) 115 सेवा नियुक्ती प्रकरणे प्रलंबित ठेवणे 5) 57 सेवानिवृत्त उपदानाची प्रकरणे 6) 43 वैद्यकीय प्रकरणे 7) 31 वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे 8)38 निवड श्रेणीची प्रकरणे 9) शिक्षक वैयक्तिक मान्यता प्रलंबित ठेवणे आणि गट विमा योजनेचे देयकावर कार्यवाही न करणे असे अनेक प्रकरण प्रलंबित असल्याचे चौकशी अंतिम सिद्ध झाले.

 त्यामुळे दिनांक 26/8/2024 ला माननीय सहसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने श्रीमती कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी माध्यमिक (सध्या जळगावला बदली) यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले.आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा यशस्वी झाला. आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. माननीय श्री नागो गाणार,माजी शिक्षक आमदार नागपूर यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यासह मागील दोन वर्षापासून पुराव्यानिशी तक्रार व निवेदनाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला. त्याचे पुरावे सुद्धा सोबत दिलेले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही संघटना भ्रष्टाचाराविरुद्ध निस्वार्थपणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात नेहमी प्रामाणिकपणे कार्य करत आहे व भविष्यात अन्यायाविरुद्ध लढत राहील.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला लाभलेले नियमाचे व कायद्याचे पुरेपूर ज्ञान असणारे अभ्यासक व भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ असलेले व अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातत्यपूर्ण न्याय व निस्वार्थ सेवा देणारे श्री नागो गाणार सर माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग नागपूर यांचे एकमेव मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला यश प्राप्त झाले.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस