पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे ईश्वरीय कार्य करणे : सुधीर मुनगंटीवार

पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे ईश्वरीय कार्य करणे : सुधीर मुनगंटीवार

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : वातावरण बदल हा आजचा सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. वातावरणातील बदलांमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या आहे. त्यामुळे ‘वातावरण बदल’ यावर चर्चा करणे गरजेचे असून पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो मनुष्य आहे. कारण त्याने पर्यावरणाचे केवळ शोषण केले आहे. जल,हवा,ध्वनी या सर्वच बाबतीत मोठे प्रदूषण पाहायला मिळते. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे ईश्वरीय कार्य करणे आहे. पर्यावरण रक्षणाची जनजागृती व्हावी या हेतूने त्यादृष्टीने चंद्रपुरात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातर्फे जानेवारीत आयोजित पर्यावरणाचे आंतरराष्ट्रीय परिषद ही महाराष्ट्रातील नव्हे, तर जगातील उत्तम परिषद करण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या वतीने १६, १७, व १८ जानेवारी २०२५ ला चंद्रपुरात ‘वातावरण बदल’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेची पूर्वतयारी करण्यासाठी गुरुवारी २२ ऑगस्टला वनअकॅडमी येथे प्री-कॉन्फरन्स’ आयोजित केली. यावेळी ते बोलत होते. या प्री कॉन्फरन्स ला न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक नील फिलिप, एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबईच्या च्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, मनपाचे आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, श्रीनिवास रेड्डी, तानाजी यादव, अशोक खडसे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, एस एन डी टी च्या अधिष्ठाता डॉ. जयश्री शिंदे, डॉ.योगेश नेरकर, डॉ. संजय शितोले, बल्लारपूर येथील उपकेंद्राचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड आदी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी डॉ. उज्वला चक्रदेव यांचे प्रास्ताविक झाले. यावेळी विद्यापीठाच्या बल्लारपूर उपकेंद्रात सिटी युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या सहकार्याने बसवलेले ‘वेदर स्टेशन’ चे उद्घाटन सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.पर्यावरणा संदर्भात कर्तव्याचा सर्वांना विसर पडला असून आज संविधानातील अधिकार सर्वांना हवी आहे. मात्र दायित्व कर्तव्य याचा विसर पडला आहे. वसुंधरा मातेचे ऋण पर्यावरणाचे रक्षण करून न चुकवता लाखो हात दररोज प्रदूषण करीत आहे. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगात आज प्रेम, आपुलकी, समाधान याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे दुर्दैवाने मनुष्य डिप्रेशनसारख्या समस्येने ग्रासला आहे. त्यामुळे आम्हाला आज पर्यावरण रक्षणाचा ग्लोबल वॉर्मिंग चा विचार करावा लागेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.

एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ओळखून सर्वदूर जनजागृती करण्यात पुढाकार घेत असून यात महाराष्ट्र शासनाचे नक्कीच हातभार लाभत आहे. वातावरण बदल या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने चंद्रपूर येथील नियोजित परिषद कशी महत्वाची आहे याविषयी कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयश्री शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योग प्रतिनिधी आणि संशोधक यांच्या सोबत विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रम संबंधी संवाद साधला. संजय शितोले यांनी वातावरण बदल या विषयावरील जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेविषयी सांगितले. कार्यक्रमाचे आभार कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी मानले तर संचालन प्रा.अपेक्षा पिंपळे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील उद्योग प्रतिनिधी, प्राध्यापक, संशोधक उपस्थित होते.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस