एक मेसेज आला... अन् ...तब्बल 12 लाख 61 हजाराने लुटले
करंजी रोड येथील घटना अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
आधुनिक केसरी न्यूज
पांढरकवडा : तालुक्यातील करंजी रोड येथील एका कृषी व्यवसायीकाची मोबाईलवर टेक्स मैसेज करून त्या व्यवसायीकाच्या खात्यातुन तब्बल 12 लाख 61 हजार रुपये अज्ञात भामट्याने काढून फसवणूक केल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी घडली असून याबाबत फसवणूक झालेल्या इसमाने 2 रोजी रात्री पोलिसात तक्रार दिल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अशोक केशवराव मिलमिले 59 रा करंजी रोड असे फसवणूक झालेल्या व्यवसायीकाचे नाव आहे. मिलमिले यांचे करंजी रोड येथे कृषी सेवा केंद्र आहे. त्यांना मोबाईलवर एक टेक्स मॅसेज आला होता. त्यांनी तो मैसेज उघडुन पाहिला आणि नंतर मोबाईल ठेवून दिला. त्यानंतर ते दुकानातील कामात व्यस्त होते. त्यांनी रात्री दुकान बंद करून घरी जेवण केल्यानंतर रानी 9 वाजता दरम्यान त्यांनी मोबाईल उघडुन पाहिला असता त्यांच्या बँक खात्यातून 5 लाखाचे दोन तर 2 लाख 61 हजार
रूपये असे एकूण 12 लाख 61 हजार रुपये ऑनलाईन विड्राल झाल्याचे दिसून आले. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांचे बैंक खाते असलेल्या ए यु स्मॉल फायनान्स बँक वणी येथील शाखा व्यवस्थापकाशी संपर्क करून खात्यातील रक्कमेबाबत विचारपूस केली असता. त्यांनी वरील प्रमाणे खात्यातून रक्कम ऑनलाईन ट्रान्झेक्शन झाल्याचे सांगितले. तेव्हा मिलमिले यांनी 2 रोजी रात्री पांढरकवडा पोलीस स्टेशन मध्ये येवून घटनेची तक्रार नोंदविल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Comment List