आरोग्य अधिकारी कार्यालयाचा लेखापाल लाच; स्विकारतांना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात...

आरोग्य अधिकारी कार्यालयाचा लेखापाल लाच; स्विकारतांना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात...

आधुनिक केसरी न्यूज 

गोरेगाव : कंत्राटी आरोग्य परिचारिकेचा एनसीडीच्या माध्यमातून मिळणारा प्रोत्साहन भत्ता काढण्यासाठी लाच मागणार्‍या तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील  कंत्राटी लेखापाल  एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही सापळा कारवाई आज (ता.१) जिल्हा लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आली. सुरेश रामकिशोर शरणागत (३६) असे लाचखोर कंत्राटी लेखापालाचे नाव आहे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातंर्गत गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील चोपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येत असलेल्या गिधाडी उपकेंद्रात कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविका हिने रितसर एनसीडीचे प्रोत्साहन भत्तासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव स्वरूप मिळणार्‍या १६५०० रूपयाचे देयक काढण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात कार्यरत कंत्राटी लेखापाल सुरेश शरणागत याने आरोग्य सेविकेला ३ हजार रूपयाची लाच मागितली.

लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने आरोग्यसेविकेने गोंदिया लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. यावरून लाचलुचपत विभागाकडून या प्रकरणाची शहनिशा केली असता आरोपी सुरेश शरणागत हा पदाचा दुरूपयोग करून लाच मागत असल्याचे समोर आले. दरम्यान तडजोडी अंती अडीच हजार रूपये लाच देण्याचे ठरले. तसेच आरोपीने लाच स्विकारण्याचीही तयारी दर्शविली. आज (ता.१) सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष आरोपी शरणागत याला अडीच हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही सापळा कारवाई तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात करण्यात आली. 

या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गोरेगाव पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक राहुल माकनीकर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक विलास काळे यांच्या नेतृत्वात पोनि उमाकांत उगले, अतुल तवाडे, सफौ कर्पे, संजय बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, अशोक कापसे, वैâलास काटकर, संतोष बोपचे, प्रशांत सोनवाने, संगीता पटले, रोहिणी डांगे, दिपक बाडबर्वे यांनी केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी : सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील ३० वर्षांच्या पर्यावरणाची बिजे रोवली गेली पाहिजे. तसेच 'क्लायमॅट चेंज'...
डॉ.बाबा आमटे यांच्या आनंदवनाला ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 3 कोटी 8 लाखांचा निधी तातडीने वितरित
मोठी बातमी : शरद पवारांचा अमित शाहांवर 'वार'.... देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार....
मकरसंक्रांत निमित्त पैठणला नाथ महाराज समाधी व आपेगावी माऊली मंदिरात पतंग,फुलांची आरास 
लाचखोरी : बल्लारशाह पोलीस उपनिरीक्षकाविरुध्द ( ACB ) अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई 
AID ऍडव्हांटेज विदर्भ परिषद औद्योगिक विकासाची आणि युवकांच्या भविष्याची दिशा निश्चित करणारा मार्ग : आ किशोर जोरगेवार
चंद्रपूरमधून होईल ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद : आ.सुधीर मुनगंटीवार