इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ; नागपूर विभागाच्या अध्यक्षपदी अँड.सुरेश गेडाम यांची निवड
आधुनिक केसरी न्यूज
नागपूर : इंडियन सोसायटी ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट नागपूर विभागाच्या कार्यकारी मंडळाचे स्थापना कार्य 27 जुलै रोजी आर पी टी एस सभागृहात पार पडले . या कार्यक्रमाला नागपूर येथील परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त श्री विजयकांत सागर यांची उपस्थिती होती . नवीन कार्यकारणी निवडण्याच्या अतिशय उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ,नागपूर विभागाच्या अध्यक्षपदी एडवोकेट सुरेंद्र गेडाम तर उपाध्यक्षपदी कमल चोप्रा , सचिव पदी डॉक्टर वैशाली रहाटे व कोषाध्यक्ष म्हणून श्री रविकुमार कुशवाह यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांमध्ये डॉक्टर युगल रायलू , डॉक्टर समीर पिंगळे , डॉक्टर विजय फाटे यांची तर व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी श्रीमती कल्पना गेडाम , प्रशांत घोडपकर डॉक्टर श्रुती पटले , विवेक श्रोत्री आदींची निवड करण्यात आली आहे .
या कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी आपल्या अभिभाषणात सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि कौशल्य वाढविण्यावर भर देण्यात यावा असे मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाच्या औचित्याने डॉक्टर अभय भावे यांनी आय एस टी डी च्या मिशनच्या संबंधात कौशल्य विकासाच्या प्रासंगिकतेवरही मार्गदर्शन केले . तर डॉक्टर युगल रायलू यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य , पोलीस प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत घोडपकर यांनी तर आभार वैशाली रहाटे यांनी मानले .
Comment List