खेड्या-पाड्यातील शेतकरी-शेतमजुरांची व्यथा,

खेड्या-पाड्यातील शेतकरी-शेतमजुरांची व्यथा,

आधुनिक केसरी न्यूज 


तेल संपलं  वात जळाली
समई आहे ना ..पुन्हा पेटवू ...!
सावरा तोल स्वतः अनमोल
आयुष्य आहे ना.. पुन्हा चेतवू...!
                      शेतकरी म्हणजे काय? याची व्याख्या केली, तर जमीन नांगरून तिच्यात बी पेरणे आणि पेरलेल्या बिया व त्यांच्या रोपांची काळजी घेऊन त्यांच्यापासून धान्य मिळविणे ही शेतकऱ्यांची व्याख्या, भारत ही खेड्यांची भूमी आहे’, ‘भारत हा कृषिप्रधान देश आहे’, ‘शेतकरी हा देशाचा आत्मा आहे’ ही आणि अशी अनेक वाक्ये आपल्यासाठी नवीन नाहीत. या तर्काने तर आपल्या देशात शेती हा एक उदात्त व्यवसाय असला पाहिजे. आपला अन्नदाता, भारतातील शेतकरी सुखी आणि समृद्ध असायला हवा, पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. शेतकऱ्यांना देशाचा कणा म्हणून संबोधले जात असले तरी ते गरिबीत जगत आहेत. आपल्या कुटुंबाला दोन वेळचे अन्न मिळावे यासाठीही त्यांची धडपड सुरू आहे, सध्या शेतीतील प्रश्न भयावह स्वरूपाचे बनले आहेत. काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणातून सापडतात.त्यांचे ग्रामीण समाज व शेतीबाबतचे विचार आजही फारसे समोर आले नाहीत,हे आमचे दुर्दैव. १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव जाणते राजे होते की त्यांच्या रयतेतील प्रजा सुखी होती, आनंदी होती. 
                ३०-४० रुपये किलोने एखादे धान्य घेत असू, तर शेतकऱ्याला त्या धान्याचे २, ३ किंवा ४ रुपये प्रतिकिलो मिळतात. इतकी बिकट परिस्थिती त्यांची आहे. हेच  बदलते हवामान, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, शेतमालाचे गडगडलेले दर, सिंचनाचा अभाव, सावकारी कर्जाचा डोंगर, परतफेडीसाठी तगादा, जगण्याच्या साधनांवर आलेला ताण, अशा प्रमुख कारणांमुळे अजूनही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत,याचंच ज्वलंत उदा,  १९ मार्च १९८६. या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने चार मुलं , पत्नी सह आत्महत्या केली.राज्यातील पहिली शेतकरी  आत्महत्या म्हणून नोंदवली गेली,    सगळं  राज्य हळहळले.  आणि तेव्हापासून असंख्य शेतकऱ्यांनि आपले जिवन संपुष्टात आणले, 
              भारतातील ७० टक्क्यांहून अधिक कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. कृषी हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे कारण ते एकूण जीडीपीमध्ये सुमारे १७% योगदान देते आणि लोकसंख्येच्या ६०% पेक्षा जास्त लोकांना रोजगार प्रदान करते . अन्न, निवासस्थान आणि नोकऱ्यांद्वारे उपजीविकेला आधार देणे;  कच्चा माल प्रदान करणे; आणि व्यापाराद्वारे मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करणे, 
             भारताच्या शेतीची एक विस्तृत पार्श्वभूमी आहे जी कमीत कमी १० हजार वर्षापूर्वीची आहे. सध्या जगात भारताचा कृषी उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. २००७ मध्ये शेती ती आणि इतर उद्योगांनी भारताच्या जीडीपीच्या १६% दरापेक्षा अधिक उत्पादन केले.देशाच्या जीडीपीच्या दरामध्ये कृषीच्या योगदानात सतत घट झाल्यानंतरही देशातील सर्वात मोठा उद्योग आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात शेती महत्त्वाची भूमिका बजावते.गहू, तांदूळ, कापूस, गहू, रेशीम, भुईमूग आणि इतर डझनभर उत्पादन करणारा जगातील भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भाज्या आणि फळे यांचे हे सर्वात मोठे कापनीयंत्र देखील आहे जे अनुक्रमे ८.६% आणि १०.९% एकूण उत्पादन दर्शवते. भारतात उत्पादित होणारे मुख्य फळ आंबा, पपई, चिकू आणि केळी आहेत. जगात भारतामध्ये सर्वात जास्त पशुधन असून ते २८१ दशलक्ष इतके आहे, 
            या पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून गोपालक आणि पशुपालक हेच या पृथ्वीचे खरे मालक आहेत, असे आम्ही अनेकदा  ऐकले आहे, परंतु या व्यवस्थेमुळे खेड्यापाड्यातील शेतकरी शेतमजूर वर्ग  दररोज उद्भवणाऱ्या समस्येला तोंड देत सामोरे जात आहे, शेतकरी शेतमजूर या काळ्या मातीचे जोपासकर्ते आहेत, त्यांच्या अथक परिश्रमामुळे देशातील शेती ही टिकून आहे, दररोज वेग-वेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात त्या समस्सेला तोंड देत सामोरे जात आहे, 
                 कधी निसर्ग कोपतो तर कधी  व्यवस्था शेतकऱ्यांचा मारा करते, ग्रामीण भागामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण  वाढत आहे,  ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे, या कडे सुद्धा या व्यवस्थेने बघितलं पाहिजे परंतु या व्यवस्थेमध्ये राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांकडे बघायला सुद्धा वेळ नाही, जो पर्यंत या व्यवस्थेत शेतकरी राज्याप्रति जिव्हाळ्याची भावना निर्माण होत नाही, तोवर या  रोज होणाऱ्या अन्यायवर  आळा घालणे शक्य  नाही, गेल्या दशकापासून शेती,शेतकरी, शेतमाल याबाबतच्या चर्चा जवळजवळ थांबल्या आहेत. याचा अर्थ शेतीत सारे आबादी आबाद आहे, असे नाही. उलट शेती,शेतकरी बेदखल करत, सगळी चर्चा राजकारण, गटबाजी, मेळावे, राजकीय तंटेबखेडे, कोर्टबाजी इकडे वळविली गेली आहे. शेतकऱ्याची परिस्थिती कशी झाली आहे, ते लिहायला शब्द नाहीत! शेतकऱ्याची आत्महत्या हा आता बातमीचाही विषय राहिला नाही. रोज मरे त्याला कोण रडे..? शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण बनले आहे. सध्या वापरात असलेला शेतकरी शेतमजूर अतिशय कठीण परिस्थितीत जिवन जगत आहे, ही व्यवस्था शेतकरी राज्याला जगू सुद्धा देत नाही, आणि मरू सुद्धा देत नाही, 
             शेतकऱ्यांना काडीचाही त्रास देऊ नका. त्यांच्याकडून विनामोबदला गवत, भाकरी, फाटे, भाजीपाला घेऊ नका. जर तुम्ही शेतकऱ्यांना त्रास द्याल तर त्यांचा तळतळाट लागेल. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा. अन्यथा उंदीर येऊन पेटती वात घेऊन जाईल. त्यामुळे गंजीला (कडबा) आग लागेल. शेतकऱ्यांचे नुकसान होईल, जनावरांना चारा मिळणार नाही. निष्ठूर (निष्काळजी) होऊ नका.’’ शेतकऱ्यांना मदत हीच आपली (मराठ्यांची) इज्जत आहे, शिवरायांनी शेतीत आमूलाग्र क्रांती केली. जमिनीची प्रतवारी ठरवली. मलिकंबरी पद्धतीतील त्रुटी दूर करून शेतकरी हिताचे निर्णय घेतले. गरीब शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते.
                शिवाजीराजे म्हणतात, की गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना गोळा करा. त्यांना शेती कसावयास बैलजोडी नसेल तर बैलजोडी खरेदी करण्यास मदत करा. उदरनिर्वाहासाठी खंडी, दोन खंडी धान्य द्यावे. आपल्या राज्यात कोणीही उपाशीपोटी राहता कामा नये, हे शिवरायांचे अन्नसुरक्षा धोरणच होते. शिवाजीराजांनी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले. त्याची वसुली टप्प्याटप्प्याने म्हणजे शेतकऱ्यांना ऐपत आल्यानंतरच केली. त्यासाठी स्वराज्याच्या तिजोरीवर बोजा पडला तरी तमा बाळगली नाही. शेतकरी हितासाठी तिजोरीचा विचार न करणारे शिवाजीराजे होते.
                        *देशाची प्रगती तो पर्यंत अपूर्ण आहे, जो पर्यंत शेतकऱ्यांचा विकास होत नाही…!!*

आस्मानानं तर लुटलंच
सुलतानांची ही वक्रदृष्टी
मातीत राबतो त्यालाच
मातीत घालते सृष्टी..!!
*शेतकरी जगेल,, तरच देश टिकेल…..!*

विष्णु गजाननराव बाजड 
अध्यक्ष- कास्तकार फाऊंडेशन,

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी : सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील ३० वर्षांच्या पर्यावरणाची बिजे रोवली गेली पाहिजे. तसेच 'क्लायमॅट चेंज'...
डॉ.बाबा आमटे यांच्या आनंदवनाला ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 3 कोटी 8 लाखांचा निधी तातडीने वितरित
मोठी बातमी : शरद पवारांचा अमित शाहांवर 'वार'.... देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार....
मकरसंक्रांत निमित्त पैठणला नाथ महाराज समाधी व आपेगावी माऊली मंदिरात पतंग,फुलांची आरास 
लाचखोरी : बल्लारशाह पोलीस उपनिरीक्षकाविरुध्द ( ACB ) अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई 
AID ऍडव्हांटेज विदर्भ परिषद औद्योगिक विकासाची आणि युवकांच्या भविष्याची दिशा निश्चित करणारा मार्ग : आ किशोर जोरगेवार
चंद्रपूरमधून होईल ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद : आ.सुधीर मुनगंटीवार