राष्ट्रवादी काँग्रेसने केला जीएसटी,भाजपासह केंद्र सरकारचा निषेध
अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू व दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी मागे घ्या राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
आधुनिक केसरी न्यूज
आकाश सोनवणे
धुळे : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अन्नधान्य , दुग्धजन्य पदार्थ , जीवनावश्यक वस्तू , किराणा साहित्य यावरील जीएसटी मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
केंद्रतील भाजप सरकारने आजपासून देशातील सर्व अन्नधान्य , जीवनाश्यक वस्तू , दुग्धजन्य पदार्थ यावर जवळपास 12 ते 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे . यामुळे मोठ्या प्रमाणात आजपासून महागाईचा भडका देशांमध्ये उडणार आहे . विविध अन्नधान्य पदार्थ , दुग्धजन्य पदार्थ जीवनाश्यक वस्तू , किराणा साहित्य याच्यावर जीएसटीचा आकारणी खूप मोठ्या प्रमाणात होणार असून यामध्ये पीठ , दही , पनीर , लस्सी , मखाना , सोयाबीन , वाटाणा , गहू , तांदूळ , मुरमुरे , चहा , कॉफी ब्रेड गूळ , पाव या सर्व विविध प्रकारच्या पदार्थावर 12 ते 18 टक्के जीएसटी आजपासून आकारण्यात येणार आहे . यामुळे गरीब व सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले जात जाणार आहे . नागरिकांना महागाईचा फटका बसणार आहे . यासंदर्भात जीएसटीचा विरोध करण्यासाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाने आज माननीय जिल्हाधिकारी यांची यांची भेट घेऊन या संदर्भाचा केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करून सदर जीएसटी मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे ही मागणी मान्य करण्यात आली नाही , तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तीव्र स्वरूपाचे रस्त्यावर आंदोलन करेल असा इशारा या निमित्ताने देण्यात आला . या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले, रईस काजी, भूषण पाटील, उमेश महाजन, राजेंद्र सोळुंके, दीपक देसले, मयूर देवरे, एजाज शेख, संतोष गायकवाड, गोलू नागमल, स्वामिनी पारखे, दीपक देवरे, तरुणा पाटील, राजू डोमाळे, निलेश चौधरी, संजय माळी, असलम खाटीक, नजीर शेख, भीकन नेरकर, निखिल पाटील, हरिचंद्र वाघ, फिरोज पठाण, कैलास चौधरी, जोसेफ मलबारी, अन्सारी अब्दुल कादिर, वाल्मीक मराठे, महेंद्र बागुल व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Comment List