चंद्रपूरच्या विधी क्षेत्राने मानले आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूरच्या विधी क्षेत्राने मानले आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : चंद्रपूरच्या विधि क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीसाठी पुढाकार घेतला. केवळ प्रस्ताव देऊन थांबले नाही, तर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. येत्या ८ फेब्रुवारीला या इमारतीचा कोनशिला समारंभ होऊ घातला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी परीश्रम घेतले म्हणून हा दिवस उगवला आहे, अशी भावना व्यक्त करीत चंद्रपूरच्या विधी क्षेत्राने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.* 

आ. श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला होता. या कामासाठी राज्य शासनाने ६० कोटी ७६ लक्ष रुपये मंजूर केले आहेत. २०१७ पासून प्रलंबित असलेला विषय आ.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे. शनिवार, दि. ८ फेब्रुवारी २०२५ ला दुपारी १२.४० वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन न्यायमंदिर, जिल्हा न्यायालय येथे होणार आहे. वन प्रबोधिनीच्या विद्युत हॉलमध्ये मुख्य समारंभ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती आलोक आराधे, न्यायमुर्ती नितीन सांबरे, न्यायमुर्ती अनिल पानसरे उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीचा प्रस्ताव चंद्रपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी शासनाला पाठवला होता. त्याआधारे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य  ॲड. पारिजात पांडे, चंद्रपूर जिल्हा बार असोसीएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर, माजी सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार, माजी उपाध्यक्ष ॲड. राजेश ठाकूर यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली होती. चंद्रपूरच्या विधि क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन ना. श्री. मुनगंटीवार यांनी शासनस्तरावर या विषयाचा पाठपुरावा केला. जिल्ह्यातील न्यायदान प्रक्रिया अधिक गतीमान होण्यात इमारतीचा अडसर ठरू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 

त्यामुळे सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्दा निकाली निघाला. आ.  मुनगंटीवार यांनी प्राधान्याने या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल चंद्रपुरातील विधि वर्तुळातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲड. पारिजात पांडे, चंद्रपूर जिल्हा बार असोसीएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर, माजी  सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार, माजी उपाध्यक्ष ॲड. राजेश ठाकूर यांनी आभार मानले आहे.

१२ कोर्ट हॉल आणि अद्ययावत यंत्रणा
चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमध्ये एकूण १२ कोर्ट हॉल असणार आहेत. याठिकाणी अद्ययावत यंत्रणा आणि अत्याधुनिक सुविधांचा मेळ बघायला मिळणार आहे. अंतर्गत आणि बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मलनिःसारण, अग्नीशमन यंत्रणा, सुसज्ज वाहनतळ, वातानुकुलित यंत्रणा, वाढीव क्षमता असलेले उद्वाहन (लिफ्ट), सीसीटीव्ही, पॉवर बॅकअप आदींची तरतूद कामांतर्गत करण्यात आली आहे. न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देत रस्ते, विज, आरोग्य , शिक्षण, पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव तरतूद करुन राज्याला तिव्र गतीने विकसित करणारा अर्थसंकल्प राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देत रस्ते, विज, आरोग्य , शिक्षण, पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव तरतूद करुन राज्याला तिव्र गतीने विकसित करणारा अर्थसंकल्प
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : आज दि.१० मार्च २०२५ रोजी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय...
सर्वसमावेशक आणि विकासोन्मुख अर्थसंकल्प 
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित दादांनी केला 'हा' वादा....2047 पर्यंत...
महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
राज्यात खाणपट्टे लिलाव प्रक्रियेला गती द्यावी
“राष्ट्रपती महोदया, आम्हाला खुन करण्याची परवानगी द्या…”
क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव होणार संमत