उपमुख्यमंत्री आजीतदादा पवार यांच्या कडून चव्हाण परिवाराचे सांत्वन,गुरुवारी सकाळी नायगाव येथे भेट
आधुनिक केसरी न्यूज
तानाजी शेळगांवकर
नायगाव : नांदेड लोकसभेचे खा.वसंत चव्हाण यांचे निधन झाल्या नंतर त्यांच्या कुंटूबियाचे सांत्वन करण्या साठी गुरुवारी सकाळी सकाळी सव्वासात वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नायगाव येथील चव्हाण परिवाराची भेट घेतली. व आस्थेवाईक पणें चव्हाण परिवारासोबत चर्चा केली.
गुरुवारी सकाळी भल्या पहाटे साडे पाच सहा वाजता रस्त्याने बंदोबस्त लावल्या जात होता .या वरून कोण्ही तरी येणार याची चाहूल लागण्या आगोदरच आजितदादा पवार यांचा ताफा नायगाव शहरात आला.सरळ चव्हाण परिवाराच्या वाड्यावर जाऊन दिवंगत खा.वसंत चव्हाण यांचे प्रतिमेचे पूजन करीत दर्शन घेतले व आस्थेवाईक पने चव्हाण परिवार यांच्या शी चर्चा केली.
या वेळी त्यांच्या समवेत आ.विक्रम काळे,आ.श्याम शिंदे,बळवंत पाटील बेटमोग्रेकर,
जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार जीवन पा.घोगरे,प्रा जीवन चव्हाण,बाबुराव कदम,गोविंदराव शिंधिकर, फाजगे मामा, राम मामा तममणा,आदी हजर होते.
या वेळी दिवंगत खा.वसंत चव्हाण यांच्या पत्नी सुंदर ताई चव्हाण,चिरंजीव प्रा.रवींद्र चव्हाण,रणजित चव्हाण, बंधु केशव पा.चव्हाण, हांनमत पा.चव्हाण,सुधाकर पा.चव्हाण,आनंद पा.चव्हाण,श्रीनिवास पा.चव्हाण,विजय पा.चव्हाण, धंनजय पा.चव्हाण,श्रीधर पा.चव्हाण, डॉ विश्वास चव्हाण,चव्हाण परिवार,
या सह माजी सभापती संजय आपा बेळगे,नायगाव नगर पंचायत आध्यक्ष प्रंतीनिधी.संजय चव्हाण व सर्व नगरसेवक,चव्हाण मित्र मंडळ कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Comment List