नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा म्हणजे एक नाटक,जनसामान्य नागरिकांची भावना  

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा म्हणजे एक नाटक,जनसामान्य नागरिकांची भावना  

 

IMG-20231031-WA0014

 

आधुनिक केसरी न्यूज

विक्रम पासलकर 

इगतपुरी : मराठा आरक्षणासाठी लढत असलेले व गेल्या सात दिवसांपासून अन्न, पाण्याविना बेमुदत अमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिक जिल्ह्यात सकल मराठा समाजातर्फे ठिकठिकाणी साख़ळी उपोषण,मशाल रैली, कैंडल मार्च तर गावागावात सरकार विरोधात निषेध सभा होऊन राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. सर्वत्र मराठा आरक्षण लढा समाजाने आता आपल्या हातात घेतला असून ग्रामपंचायत सरपंच,सदस्य तसेच गावच्या सोसायटीचे संचालक देखील राजीनामा देवून आपला निषेध व्यक्त करत असल्याचे दिसुन येत आहे. काल सोमवारी नाशिक चे खासदार हेमंत गोडसे हे एका सार्वजनिक कार्यक्रमात समाजबंधवांच्या जाळयात सापडले आणि सर्वानी त्यांना घेराव घालून संसदेत  मराठा आरक्षणाबाबत का तुम्ही बोलत नाही असा जाब बिचारला. समाजहित लक्षात घेवून आणि कसलाही विचार न करता त्यांनी तड़क आपले नाशिक शहरातील कार्यालय गाठले आणि स्वताच्या लेटर हेडवर एक राजीनामा पत्र लिहून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फैक्स करुण दिले खरे मात्र या बाबत ची खबर काल सायंकाळपासून तर आज दिवसभर शोशल मिडियावर फिरत असताना गोडसे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे या राजीनामा पत्रात रानीनाम मंजूर करण्यात यावा असे महंटलेले नाही.

      दरम्यान नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतिच्या वार्ड क्र 1 च्या मराठा सदस्य दीपिका शरद नाठे यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा आज दुपारी तड़काफड़की राजीनामा देवून मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या आन्दोलनाला जाहिर पाठिम्बा दिला आहे. सरपंच शरद सोनवणे तसेच ग्रामविकासाधिकारी विजयराज जाधव आणि समस्त गावकरी मंडळी यांचे समक्ष दीपिका नाठे यांनी राजीनामा देवून इगतपुरी तालुक्यात राजीनामा देण्याच्या पहिला मान घेतला आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर अशा पदांवर राहण्याचा अधिकार नाही असे त्यानी केसरी शी बोलताना सांगितले.

        खासदार हेमंत गोडसे यानी आपल्या खासदारकिचा राजीनामा पत्र पक्ष प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे धाडून मोकळे झाले खरे मात्र त्यातून त्यांना मिळणा-या सहानुभूति पेक्षा राजीनामा नाट्यामुळे नागरिकांच्या संतप्त रोषाला जास्त सामोरे जावे लागले आहे. खरे तर देशाच्या सर्वोच्च सदनाचे सदस्य हे लोकसभा अध्यक्ष यांचेकड़े आपल्या खासदारकिचा राजीनामा देणे गरजेचे असते अशी एक घटना आहे. पक्ष प्रमुख राजीनामा कधीही मंजूर करु शकत नाही  व त्यांना तसा अधिकारहि नाही. मग खासदार गोडसे यांनी तो दिल्ली दरबारी न देता फैक्स करुण मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कड़े द्यायची क़ाय गरज होती असेही बोलले जात आहे. आज दिवसभर फेसबुक, व्हाट्सअप आणि बिविध सोशल साइटवर गोडसे यांच्या राजिनामा बाबत नको त्या प्रतिक्रिया व संतप्त भावना नागरिकांनी बोलून व्यक्त केल्या. राजीनामा पत्रात त्यांनी आरक्षण लढा, नोक-या आदि महत्वाचे विषय घेवून मराठा समाजाच्या 
     
       गोडसे, नाठे  यांच्या राजीनाम्यानांतर  इगतपुरी तालुक्यातील दूसरी औद्योगिक वसाहत असलेल्या वाडिव-हे गावच्या सहकारी सोसायटिचे संचालक समाधान गवते देखील आपल्या संचालक पदाचा बुधवारी 1 नोव्हे रोजी राजीनामा देणार असल्याचे कळते आहे. मराठा आरक्षणासाठी  शासनाच्या विरोधात नेत्यांच्या गावबंदी नंतर विविध गावचे सरपंच,सदस्य आता राजीनामा देण्याच्या तयारित असल्यामुळे मराठा आरक्षण लढा नाशिक जिल्ह्यात  अधिक तीव्र होताना दिसत आहे.  

      प्रतिक्रिया: जे लोकप्रतिनिधि राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, त्यानी तो द्यायचाच असेल तर तो भारतीय राज्य घटनेने राजीनामा मंजूर करायचा अधिकार दिला त्यांचेकडे सविनय सादर करायचा असतो. मुळात नाशिक ची जनता आणि तमाम मराठा समाज इतका अडानी नाही, त्यांना चांगले वाइट सर्व समजते. ज्याणी कुणी तो दिला त्याचे हे एक नाटक आहे. जनतेच्या दरवारात अभय मिळणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यापेक्षा संसदेत मराठा आरक्षणाची बाजू सक्षम मांडा. महाराष्ट्र पेटत आहे वास्तव देशाला कळू दया.
      --भाई संदीप पागेरे,समाज बांधव

 

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

 भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?   भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? 
आधुनिक केसरी मुंबई : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे....
चंद्रपूरचे सात नागरिक पहलगाममध्ये अडकले,आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली तात्काळ दखल..!
भिमजयंती निमित्त वरुड येथे पोलिसांचा रूट मार्च
ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उन्हाची दाहकता ...। नाथांच्या समाधीला व  पांडूरंगाला चंदन - उटीचा लेप 
इंटॅकच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक सिंह ठाकूर यांचा सत्कार
चंद्रपुरात चैत्र पौर्णिमेनिमित्त ५१ फूट ध्वजाचे भव्य ध्वजारोहण