बल्लारपूर नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? : रविभाऊ पोप्पलवार. 

बल्लारपूर नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? : रविभाऊ पोप्पलवार. 

आधुनिक केसरी न्यूज 

बल्लारपूर : शहरातील नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीबाबत आम आदमी पक्षातर्फे मागल एप्रिल महिन्यात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. पुन्हा जुलै च्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट  घेऊन योग्य कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. अनियमितपणे कर्मचाऱ्यांमध्ये अधिकारांचे वाटप करण्यात आले आहे. थेट वर्ग 4 चे कर्मचारी विभागप्रमुख बनवले गेले आहेत व त्यांच्या हाताखाली वर्ग 3 चे कर्मचारी काम करत आहेत. अनेक विभागात लिपिक नाही, उप मुख्याधिकारी यांना काही माहीत नाही नागरिकांची गैरसोय होत आहेत. बदलीविना अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नोकरीला आहेत. पुर्वी शिक्षण विभागाची जबाबदारी प्रवासकिय अधिकाऱ्यांकडे राहत असे परंतु आता हि जबाबदारी एका शिक्षकाकडे सोपविण्यात आली आहे. आधीच शिक्षकांची संख्या कमी आहे. तर शिक्षकांनी शिकवायचे कि इतर जबाबदारी सांभाळची. हि सर्व तक्रार त्या निवेदनात करण्यात आली. तरीही दोनदा निवेदन देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनही कोणतीच कारवाई केली नाही. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी इतक्या गंभीर प्रश्नाबाबत दुर्लक्ष करने फारच दुर्दैवी असल्याचे रविभाऊ पुप्पलवार यांनी म्हटले. यासोबतच प्रशासक म्हणून असलेले मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला जिल्हाधिकाऱ्यांचे समर्थन आहे का? अनेक वर्षांपासून नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांची बदली का झालेली नाही? असे प्रश्न आपचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी उपस्थित केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि.16 जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असून बळीराजाला सुखी करण्याचा संकल्प करण्यात आला...
मी दिलेला शब्द पाळला आता तुम्ही संघटितपणे काम करा : मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य : पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार
भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!
सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरच्या ऑटोचालकांसाठी आकर्षक स्थानक..!