ऊस उत्पादकांना सरकारकडून गोड बातमी!
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ आणि CCEA च्या बैठकीमध्ये उसाचा खरेदी दर वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ आणि CCEA च्या बैठकीमध्ये उसाचा खरेदी दर वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. उसाच्या दरात प्रति क्विंटल ५ रुपयाने वाढ करावी असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. आता उसाचे खरेदी मुल्य वाढणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १० टक्के वसुलीच्या आधारावर उसावरील वाजवी आणि मोबदला देणारी किंमत (FRP) २९० रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री गोयल यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या निर्णयामुळे उस उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळला आहे.
मागच्या वर्षीही प्रतिटनामागे १०० रुपयांनी वाढ
उसाच्या खरेदी दरामध्ये १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९ ऑगस्ट २०२० ला घेण्यात आला होता.
खरेदी दर कोण निश्चित करते?
राज्य शासन, किंवा केंद्र शासन खरेदी दर निश्चित करीत नाही. केंद्रीय कृषी मुल्य आयोग दरवर्षी सर्व अभ्यास गोष्टींचा करुण याची माहिती काढत असतो. त्यानुसार खरेदी दर किती असावा याची शिफारस असलेला एक प्रस्ताव केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीकडे पाठवला जातो.
संबंधीत समिती या शिफारशीचा पुन्हा अभ्यास करते. त्यात राजकीय अंदाज घेत कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीवर केंद्र सरकार अंतिम निर्णय घेते. शेतकऱ्यांना यंदा किती खरेदी मिळेल हे गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर महिन्यापूर्वी केंद्र सरकारकडून जाहीर केले जाते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List