आरोग्यविषयक जनजागृती निर्माण होण्याची गरज : सौ. लता मुळे
संवाद सेतू प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेला तीन कॉर्डलेस माइक भेट औरंगाबाद : जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लब औरंगाबादच्यावतीने “भव्य रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबीर” आयोजित करण्यात आले होते, शिबिराचे उद्घाटन इनरव्हील क्लब, औरंगाबाद अध्यक्ष सौ. लता मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सौ मुळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांच्या आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने प्रत्येक गरिब… Continue reading आरोग्यविषयक जनजागृती निर्माण होण्याची गरज : सौ. लता मुळे
संवाद सेतू प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेला तीन कॉर्डलेस माइक भेट
औरंगाबाद : जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लब औरंगाबादच्यावतीने “भव्य रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबीर” आयोजित करण्यात आले होते, शिबिराचे उद्घाटन इनरव्हील क्लब, औरंगाबाद अध्यक्ष सौ. लता मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सौ मुळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांच्या आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने प्रत्येक गरिब व गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत व विशेष म्हणजे गरजू महिलांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा इनरव्हील क्लब औरंगाबादचा निर्धार आहे.महिलांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे, म्ह्णून अशाप्रकारचे आरोग्य शिबीर सात्यताने आयोजित करण्यात येतील. असे आश्वासित करण्यात आले. काही महिलांना आर्थिक परिस्तितीमुळे औषध उपचार मिळत नाहीत म्हंणून रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबीर घेत आहोत. अनेक महिलांना स्वतःला विकार असून देखील तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात नाहीत. अशावेळी जनजागृती करून त्यांची तपासणी करणे गरजेचे असते तरच पुढील उपचार वेळेवर मिळू शकतात. शिबीरात जवळपास १२० शिबीरार्थीनी उपस्थिती लावली. शिबिरामध्ये विषेश उपस्थिती ज्येष्ठ महिलांची उल्लेखनीय होती. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबीरार्थीची मोफत आरोग्य तपासाणी करण्यात आली.
तसेच या वेळी ‘संवाद सेतू प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेला इनरव्हील क्लब, औरंगाबाद वतीने संस्थेतील होतकरू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी तीन कॉर्डलेस माइक भेट देण्यात आले. तसेच यावेळी ‘संवाद सेतू प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा डॉ सुनीता डोईबळे यांचा कर्तबगार महिला म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ स्मिता भागवत, डॉ सुनंदा कुलकर्णी, अर्चना नरसापूरकर, मेघा देशपांडे आणि इनरव्हील क्लब, औरंगाबाद सचिव छाया भोयर, पी डी सी ऊषा धामणे, आशा भांड, माधुरी अहिरराव, हिरा पेरे पाटील, चंदा धोंगडे, वसुंधरा पाटील, मंगल चव्हाण, इना नाथ, सुनंदा पाटील, रोहिणी मुळे, स्नेहल मुळे, इनरव्हील क्लब सदस्य, CSMSS आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय डॉक्टर, नर्स उपस्थित होते.


About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List