कौटुंबिक वाद न्यायालयात , म्हणून जातपंचायतीने  कुटुंबावरच बहिष्कार !

कौटुंबिक वाद न्यायालयात , म्हणून जातपंचायतीने  कुटुंबावरच बहिष्कार !

पिंपरी-चिंचवड. :वाकड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात वाकड पोलिस ठाण्यामध्ये पीडित सीताराम सागरे या

पिंपरी-चिंचवड. :वाकड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात वाकड पोलिस ठाण्यामध्ये पीडित सीताराम सागरे या तरुणाने गोंधळी समाजाच्या जात पंचायतीतील १४ पंचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादीचा आणि त्याच्या पत्नीचा वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याने, घटस्फोट घेण्यासाठी फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती मात्र फिर्यादीच घटस्फोटासाठी न्यायालयात जाण्याला जात पंचायतींने विरोध केला आहे.

न्यायालयात जाण्या ऐवजी हा घटस्फोटाचा कौटुंबिक वाद जातपंचायतीत मिटवायला हवा होता. अशी कठोर भूमिका जात पंचायतिने घेतली अशातच फिर्यादीची पत्नी ही जातपंचायतीच्या सदस्यांची नातेवाईक  असल्याने,  फिर्यादीने जातपंचायती ऐवजी न्यायालयात घटस्फोट घेण्यासाठी प्रयत्न केल्याच्या कारणावरुण संतप्त झालेल्या जात पंचायतीने गोंधळी समाजाच्या अख्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे.

सिताराम सागरे यांना जवळपास दोन वर्षापासून जातपंचायतीचा जाच सहन करावा लागत असल्याच सांगितल आहे अखेर सिताराम सागरे यांनी केलेल्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर वाकड पोलिसांनी गोंधळी समाजाच्या १४ पंचांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी  दिवसेंदिवस जातीचे राजकारण  केलं जात आहे. त्यासाठी वेगळे मोर्चे काढून आंदोलन केलं जातात, अस एकंदरीत राज्यात चित्र आहे. अशातच  जात आणि जात पंचायत महाराष्ट्रातून खरंच निर्मूलन होईल का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : तिरोडा महामार्गावर वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांत एवढा चिघळला की,...
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई 
आजपासून  मंदिरात परिसरात मोबाईल वापर करण्यास बंदी